सय्यद शाहच्या कुटुंबाला शिंदेंकडून ५ लाखाची मदत   

मुंबई,(प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणार्‍या  सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.  त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले आहे. 
 
पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि  सरहद्द  संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून शुक्रवारी  सय्यदच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

Related Articles